(रत्नागिरी)
जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने सलग तिसऱ्या वर्षी औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मागील दोन वर्षे या स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असून तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. विद्यार्थी वनस्पती व औषधी गुणधर्म याची माहिती पीपीटीद्वारे सादर करु शकतात तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक उपलब्ध नाही असे विद्यार्थी नोंदवही हा पर्याय निवडून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
तिन्ही गटासाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक व चार उत्तेजनार्थ क्रमांक काढले जाणार आहेत. एका विद्यार्थ्याने एकाच स्वरुपात सहभाग घ्यावा. नोंदवही / पीपीटी मराठी किंवा हिंदी भाषेत असावी. नोंदवही स्व हस्ताक्षरातील किंवा स्वतः काढलेली छायाचित्रे वापरुन संगणकीकृत केलेली असावी किंवा झाडाचे पान फुल लावावे. आपल्या पीपीटी/ नोंदवही ३१ डिसेंबर २०२२ पर्यत संपदा जयंत धोपटकर जेएसडब्ल्यू ओ.पी.जिंदल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर मु.नांदिवडे कुणबीवाडी पो.जयगड ता.जि. रत्नागिरी 415614 येथे पाठवावीत.
अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे यांच्याशी संपर्क साधावा