(कोल्हापूर)
भरधाव असलेली चारचाकी पलटी मारत ओढ्यात कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रस्त्यावर ही घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर या मार्गावर रहदारी नसल्याने मदतीसाठी उशीर झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी ओढ्यामध्ये उतरून जखमींना बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांमध्ये झाली आहे.
यामध्ये तांबळे अनुप खुर्द येथे राहणारे 22 वर्षीय आदिल कासम शेख आणि जहीर जावेद शेख हे दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. तर साहिल मुबारक शेख हा तरुण जखमी झाला आहे. आज दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास हे तिघेजण आपल्या चार चाकीतून अनफ खुर्द इथून अनफ बुद्रुकच्या दिशेने निघाले होते. मात्र दासेवाडी इथ आल्यावर आदीलचा भरधाव गाडीवरील ताबा सुटला.
त्यानंतर गाडी पलट्या मारत एका पुलावरून ओढ्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या घटनेमध्ये जागीच एकाचा तर उपचाराकरिता नेत असताना दुसऱ्याचा मृत्यू झाला.
अपघातात ठार झालेला आदिल हा कोल्हापुरात काल सायंकाळी आपली नवी कार नेण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह जाणार होता. आदिलचा मित्र आरमान सय्यद याला अपघाताआधी पाच मिनिटे वेसरडे येथे फोन करून याबाबत त्याने सांगितले होते. नवीन कार घरात येणार असल्याने घरातील सर्वच सदस्य आनंदित होते. मात्र, त्यांचा हा आनंद काही काळाचाच ठरला. नवीन चारचाकी आणण्यापूर्वीच आदिलसह जहीर याच्यावर काळाने घाला घातला. अपघातात तरुण मुलाचा मृत्यू ओढवल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या गाडीतून प्रवास करणारे तिघांपैकी दोघेजण जागीच ठार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गाडीतील जखमींना बाहेर काढण्यास काढले. जखमींना गारगोटीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच आदिल आणि जहीर यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर अनप खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात ठार झालेल्या आदिल याने खानापूर येथील महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. तर, जहीर हा गारगोटी येथे नोकरी करत होता.