(राजापूर / तुषार पाचलकर)
तीन वर्षापेक्षा जास्त काळ राजापूरचे PI म्हणून कार्यरत असलेले सर्वांना जवळचे वाटणारे, श्री. जनार्दन परबकर यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी, येथे PI म्हणून बदली झाली. या निमित्ताने मंगळवारी गोपिनीय विभागाचे श्री सचिन वीर यांच्या नियोजनाने राजापूर पोलीस स्टेशनं येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
अनेक वर्ष सहवासात राहिल्याने आणि कोणत्याच कर्मचारी व अधिकारी यांना न दुखवणाऱ्या जनार्धन परबकर यांचा निरोप घेताना यावेळी सर्वांचे डोळे पाणवले होते, तर शब्द मुके झाले होते. अश्यातच आपल्या राजापूरची आठवण म्हणून अर्जुना डॅम-करक येथे “मेजर कमलाकर पाटील’ यांनी क्लीक केलेला फोटो त्यांना फोटो फ्रेम सहित आपल्या राजापूरची भेट म्हणून तुषार पाचलकर यांनी दिला. यावेळी… तुझी भेट आवडली मला, मी माझ्या घरी ठेवणार, राजापूरची, तुमच्या सर्वांची आठवण म्हणून. या त्यांच्या वाक्याने सर्वांचे डोळे पुन्हा एकदा ओले झाले. अधिकारी येतात जातात.. पण त्यातील काही अधिकारी आपली जागा, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात करून जातात… हे आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमातून दिसून आले.