( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते स्वप्निल दत्ताराम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून संपूर्ण गावासह परिसरातून स्वप्निल शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.
स्वप्निल शिंदे हे गावचे युवा नेते असून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे असे व्यक्तिमत्व आहे. सामाजिक बांधिलकी जपत कष्टकरी शेतकरी लोकांमध्ये समाज प्रबोधन करून लोकशाहीचे अधिकार पटवून देण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. जनमानसात अन्याविरुद्ध प्रखरपणे लढा देणारे सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संघर्ष करणारे नेतृत्व योगदान संस्था ओरी या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहतात.
त्यांच्या निवडीबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते हितचिंतक यांनी स्वप्निल शिंदे यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपण गावात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायम भर देऊ असे ते आमच्या प्रतिनिधी बोलताना म्हणाले.