(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्राची पहिली शिक्षण परिषद ओरी केंद्राचे केंद्रीय प्रमुख प्रकाश कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली . यावेळी या शिक्षण परिषदेमध्ये विविध विषयावरती तज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये V स्कूल App या विषयाबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती ओरी केंद्र शाळेतील सहाय्यक शिक्षक रामदास चव्हाण व चाफे शाळेतील सहाय्यक शिक्षक विक्रांत पाटील यांनी दिली.
पाठ्यपुस्तकातील कोरे पान याविषयी सविस्तर मार्गदर्शन ओरी मधलीवाडी शाळेतील मुख्याध्यापक श्री .संतोष गोताड यांनी केले. तसेच विविध शालेय उपक्रमाविषयी माहिती ओरी तिवराड शाळेतील मुख्याध्यापक श्री.मांडवकर यांनी दिली. केंद्रीय प्रमुख प्रकाश कळंबटे यांनी विविध योजना तसेच प्रशासकीय कामकाज याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती देऊन शिक्षकांच्या अनेक प्रश्नांचे निरसन केले. या परिषदेत सौ.माधुरी कडवईकर यांनी ओघवत्या शैलीत संगमेश्वरी भाषेत सादर केलेली कथा सर्वानाच भावली.या परिषदेला गावच्या सरपंच सौ.श्रध्दा गोवळकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र गोवळकर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत चाफे शाळेचे मुख्याध्यापक अरुण जाधव, सहाय्यक शिक्षिका सौ. माधुरी कडवईकर, सौ. करंबेळकर, प्रमिला कुळ्ये यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले. शैक्षणिक वातावरणात ही शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेला केंद्रातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.