(जीवन साधना)
हिंदू धर्मात ओम एक विशिष्ट ध्वनी शब्द आहे. तपस्विनी आणि ध्यान करणाऱ्यांनी ध्यानस्थ होऊन ऐकल्यावर त्यांना सतत ऐकू येणारा ध्वनी. शरीराच्या आंतरिक आणि बाह्य सर्वत्र एकच ध्वनी ज्याने मनाला आणि आत्म्याला शांती मिळते. त्या ध्वनीला ओम नाव दिले गेले.
ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोझिशनमध्ये बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा. या काळात पूर्ण शरीरात कंपन होईल याचा प्रयत्न करा. जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल.
“ॐ” चे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो.
“ॐ” च्या जपाने जीव घाबरणे दूर होते.
“ॐ” चा जप केल्याने शरीरात रक्त प्रवाह योग्यरितीने होऊ लागतो
“ॐ” चा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि ह्रुदय विकाराच्या झटक्या पासून बचाव होतो.
“ॐ” चा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचन शक्ति मजबूत होते.
“ॐ” चा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते.
“ॐ” चा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो.
“ॐ” चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते.
“ॐ” चा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते.
“ॐ” चा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो.
“ॐ” चा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते.
“ॐ” चे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो.
“ॐ” उच्चारण केल्याने अँग्झायटी, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या दूर होतात.
“ॐ” उच्चारण केल्याने फुप्फुस, रक्तदाब आणि रक्तप्रवाहात सुधारणा होते. यामुळे हृदय सुदृढ राहते.
“ॐ” ओम् उच्चारण केल्याने जास्त ऑक्सिजन मिळतो. रक्तप्रवाह चांगला होतोे. यामुळे ऊर्जा वाढते.