(तरवळ/अमित जाधव)
राजापुरातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी ची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्ञानवंत विधितज्ञ वासुदेव तुळसणकर ज्ञान संकुलनातील नूतन विद्यामंदिर ओणी प्रशालेच्या गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहामध्ये 12 मे रोजी उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्वप्रथम वर्षभरात ज्ञात, अज्ञात अशा दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली वाहून सभेची सुरुवात झाली. सर्व सभासदांचे स्वागत संस्था कार्यवाह जानस्कर यांनी करून संस्था अध्यक्ष व सभा अध्यक्ष तुळसणकर परवानगीने सभेच्या कामकाजाची सुरवात केली.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळाची निवड 2023 – 2028 साठी करण्यात आली. सर्व नवनियुक्त झालेल्या संचालकांना गुलाब पुष्प देऊन पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. शहाजीराव खानविलकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित संचालकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
सन 2023 ते 2028 साठी संस्थेची नूतन कार्यकारिणीची पुढीलप्रमाणे निवड करण्यात आली.
1 अध्यक्ष- ॲड.वासुदेव शंकर तुळसणकर
2 कार्याध्यक्ष- श्री. प्रदीप धोंडू संसारे
3 उपाध्यक्ष- श्री. अरविंद दत्ताराम गोसावी
4 कार्यवाह- श्री. गणपत सदाशिव जानस्कर
5 सहकार्यवाह- श्री. सूर्यकांत विष्णु सुतार
6 खजिनदार- श्री. संतोष रामचंद्र वडवलकर
7 सदस्य- श्री. सूर्यकांत केरु तुळसणकर
8 सदस्य- श्री. गणपत तानू भारती
9 सदस्य- श्री. संजय मारुती सावंत
10 सदस्य- श्री. विजयकुमार बाळकृष्ण वागळे
11 सदस्य- श्री. अशोक धोंडू ब्रीद
12 सदस्य- श्री. महादेव बाळकृष्ण धुरे
13 सदस्य- श्री. अनंत सिताराम नागम
14 सदस्य- डॉ.शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई
15 सदस्य- ॲड. एकनाथ सिताराम मोंडे
16 सदस्य- ॲड. गुरुदत्त शहाजी खानविलकर
17 सदस्य- श्री. रामचंद्र गंगाराम जानस्कर
संस्था अध्यक्ष तुळसणकर यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व संचालकांना आपण संस्थेसाठी चांगले काम करून संस्था प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला. सन 1991 पासून आजपर्यंत सलग 33 वर्षे अध्यक्ष म्हणून काम करत असताना संस्थेची शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा व एकांकिका स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी व समाज प्रबोधनासाठी स्पर्धा घेतल्या जातात. इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सानेगुरुजी कथाकथन स्पर्धा व आई आधारकेंद्राच्या माध्यमातून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात.
याबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाची सोय व्हावी म्हणून श्री.शांताराम भट इंग्लिश मिडियम स्कूल यशस्वीपणे सुरु आहे. याबरोबरच मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उपक्रम राबविले जातात.
गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयासाठी मुंबईतील नामवंत शिक्षकांना आमंत्रित करून कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या कार्यशाळेत होणारे सर्व नियोजन संस्था करत असते. त्याबाबतचे सर्व निर्णय संस्था अध्यक्ष तुळसणकर, संस्था कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, संस्था उपाध्यक्ष अरविंद गोसावी व कार्यवाह गणपत गोसावी घेत असतात.
या सभेत अध्यक्षांच्या परवानगीने संस्था कामकाज अजून कसे चांगले करता येईल यासाठी चांगला विचारविनिमय करून श्री.सुतार सर्व नवीन संचालक व उपस्थित सभासदांचे आभार मानून सभेचे कामकाज अध्यक्षांच्या परवानगीने संपविण्यात आले. संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.