(नागपुर)
ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लिलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. याबाबत दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी ओटीटीवरील कंटेंटबाबत केंद्रातील मोदी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सर्जनशीलतेसाठी स्वातंत्र्य देण्यात आले होते. मात्र शिवीगाळ आणि अश्लिलतेसाठी नाही. जर कोणी ही मर्यादा ओलांडत असेल तर दोषींविरोधात सरकार सक्त कारवाई करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
क्रिएटिविटी के नाम पर गाली गलौज, असभ्यता बर्दाश्त नहीं की जा सकती।
ओटीटी पर बढ़ते अश्लील कंटेंट की शिकायत पर सरकार गंभीर है।अगर इसको लेकर नियमों में कोई बदलाव करने की ज़रूरत पड़ी तो @MIB_India उस दिशा में भी पीछे नहीं हटेगा। अश्लीलता, गाली गलौज रोकने के लिए कड़ी कार्यवाई करेगा। pic.twitter.com/6pOL66s88L
— Anurag Thakur (मोदी का परिवार) (@ianuragthakur) March 19, 2023
ओटीटीवरील सध्याच्या प्रक्रियेनुसार आधी प्राथमिक पातळीवर निर्मात्यांना तक्रारींचे निवारण करावं लागतं. त्यांच्या वर्तनात बदल करुन ते ९० ते ९५ टक्के तक्रारी दूर करु शकतात. त्यानंतर संघटनेच्या पातळीवर देखील या तक्रारींचे निवारण केले जाते, जास्तीत जास्त तक्रारी तिथेच निरस्त केल्या जातात. त्यानंतर जेव्हा सरकारच्या पातळीवर गोष्टी होतात, तेव्हा विभागीय समितीच्या पातळीवर त्यात कठोर कारवाईचे जे नियम आहेत, त्यानुसार आम्ही कारवाई करतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.