(संगमेश्वर)
तालुक्यातील ओझरे खुर्द मुडेकरवाडी येथील फार्महाऊसमध्ये चोरट्यांनी डल्ला मारत ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. अज्ञातावर देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शैलेश शरदचंद्र जागुष्टे यांनी फिर्याद दिली आहे. ओझरेखुर्द मुंडेकरवाडी येथे जागुष्टे यांची काजूची बाग आहे. तेथील फार्म हाऊसचा दरवाजा मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने हत्याराने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. या घटनेत चोरट्याने एक ग्रास कटर व चेन सॉ असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.