(क्रीडा)
दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा स्वप्न भंगले आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. फायनल सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर खेळला गेला.
Awesome Australia have done it 🏆
They become Women’s #T20WorldCup champions for the sixth time! #AUSvSA | #TurnItUp pic.twitter.com/IQj4poaVI9
— ICC (@ICC) February 26, 2023
ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे. यापूर्वी या संघाने 2010, 2012 आणि 2014 मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, आता 2018, 2020 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले आहेत. प्रथमच एखाद्या संघाने पुरुष किंवा महिला क्रिकेटसह ICC स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ सातव्यांदा टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत होता आणि त्यांनी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली.
केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २० षटकांत ६ गडी गमावून १३७ धावा करता आल्या. लॉरा वोल्वार्डने ४८ चेंडूत ६१ धावा केल्या. १७व्या षटकात ती बाद होताच दक्षिण आफ्रिकेच्या आशाही संपुष्टात आल्या. शेवटी २० षटकांत आफ्रिकेला केवळ १३७ धावांपर्यंत मजल मारता आली.
मेगन शुटने वोल्वर्डला एलबीडब्ल्यू आऊट बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत मेगन शुट, जेस जोनासेन, ऍशले गार्डनर आणि डार्सी ब्राउन यांनी १-१ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनी संघाची धुरा सांभाळण्यासोबतच धावसंख्या वाढवण्याचे काम करत होती. या सामन्यात बेथ मुनीने ५३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने २० षटकात ६ विकेट गमावून १५६ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनिम इस्माईल आणि मारिजाने कॅपने गोलंदाजीत २-२ बळी घेतले.