(राजकोट)
अखेरच्या वनडे सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारतीय संघाला २८६ धावांत रोखले. भारताने अखेरचा सामना गमावला असला तरी मालिकेत २-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे. संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 81 धावा केल्या. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 56 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 40 धावांत सर्वाधिक 4 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि वॉशिंगटन सुंदर यांनी दमदार सलामी दिली. दोघांनी दहा षटकात ७४ धावांची सलामी दिली. वॉशिंगटन सुंदर १८ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर आजी-माजी कर्णधारांनी डाव सांभाळला. दोघांनीही संघाची धावसंख्या वाढवली. पण भारताची धावसंख्या १४४ झाल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. रोहितने सहा षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ८१ धावांचे योगदान दिले.
रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीने अय्यरसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतकानंतर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने ५६ धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. विराट बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने भारताच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या. श्रेयस अय्यर ४८ धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांना ग्लेन मॅक्सवेल याने तंबूत पाठवले. केएल राहुल २६, सूर्यकुमार यादव आठ, रविंद्र जाडेजा ३५ धावांचे योगदान देऊ शकले.
ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर जोश हेजलवूड याला दोन विकेट मिळाल्या. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रीन आणि सांघा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
दोन्ही संघातील खेळाडू :
भारत: 1 रोहित शर्मा (कर्णधार), 2 विराट कोहली, 3 श्रेयस अय्यर, 4 केएल राहुल (विकेटकीपर), 5 सूर्यकुमार यादव, 6 रवींद्र जडेजा, 7 वॉशिंग्टन सुंदर, 8 कुलदीप यादव, 9 जसप्रीत बुमराह, 10 मोहम्मद सिराज, 11 प्रसिध कृष्णा
ऑस्ट्रेलिया : 1 मिचेल मार्श, 2 डेव्हिड वॉर्नर, 3 स्टीव्हन स्मिथ, 4 मार्नस लॅबुशेन, 5 ॲलेक्स केरी (विकेटकीपर), 6 ग्लेन मॅक्सवेल, 7 कॅमेरॉन ग्रीन, 8 पॅट कमिन्स (कर्णधार), 8 मिचेल स्टार्क, 10 तनवीर संघा, 11 जोश हॅझलवुड
खेळ सुरू झाला तेव्हा राजकोटमध्ये हलकं ढगाळ हवामान होतं. तसाच हवामान खात्यानंही अंदाज वर्तवला होता. हवामान खात्यानुसार पावसाची शक्यता केवळ 6 टक्के वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आजच्या खेळावर पावसाचा परिणाम होणार नाही हे निश्चित आहे. हलका मध्यम पाऊस पडू शकतो, सामन्यात जास्त पाऊस पडणार नाही आणि प्रेक्षक संपूर्ण सामन्याचा आनंद घेऊ शकतील, अशा परिस्थितीत प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येत आहे.