(रत्नागिरी)
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयामध्ये हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत विभिन्न प्रकारचे मोदक स्पर्धा, बिझनेस डेझर्टेशन कॉम्पिटेशन, तिरंगा डेझर्ट कॉम्पिटेशन, तिरंगा मॉक्टेल कॉम्पिटेशन अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
मोदक स्पर्धेत प्रथम. क्र. रिद्धी हर्यान व साक्षी बेर्डे, द्वितीय. क्र. समर्थ बिर्जे व साहिल सावळी व तृतीय क्र. पूजा पिसे व प्रनाली घाणेकर यांनी पटकाविला तिरंगा मॉक्टेल कॉम्पिटेशन मध्ये प्रथम क्र. प्रथमेश खरे व पूजा पीसे, द्वितीय क्र. अमित पवार व प्रज्वल तांबे तृतीय क्र. गायत्री बाईंग यांनी पटकाविला तिरंगा डेझर्ट कॉम्पिटेशन मध्ये प्रथम क्र.गायत्री पटवर्धन व प्रथमेश खरे, द्वितीय क्र, समर्थ बिर्जे व साहिल साळवी. तर तृतीय क्र. मैथिली लिंगायत व सई बारगोडे बिझनेस डेझर्टेशन कॉम्पिटेशन मध्ये हीना खतीब हीने प्रथम क्रमांक पटकावली
विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये प्रा. सुकुमार शिंदे आणि हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे या प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सोनिया मापूसकर तर आभार प्रा. ॠषिकेश मेहेंदळे यांनी मानले