(रत्नागिरी)
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने 6 वी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि 6 वी पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप 30 जून ते 2 जुलै 2023 रोजी मुंबई येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेकरीता रत्नागिरी मधील एस आर के तायक्वांदो क्लबचा खेळाडू सार्थक सूरज चव्हाण हा 53 किलो खालील गटात सहभागी होऊन सुवर्ण पदक पटकावले व 27 ते 30 जुलै रोजी लखनऊ येथे होणाऱ्या 6 वी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी सार्थकची निवड झाली असून 26 जुलै रोजी महाराष्ट्र संघ सोबत रवाना होणार आहे.
त्याच्या या यशाबद्दल शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील,उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तालुका अध्यक्ष राम कररा, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकावाना, क्लब उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य विरेश मयेकर निखिल सावंत कांचन काळे यांनी अभिनंदन केले व फुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या
सार्थक एस आर के तायक्वांदो क्लब जिल्हा क्रिडा संकुल मारुती मंदिर येथे प्रशिक्षण घेत असून त्याला राष्ट्रीय पंच प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.