(चिपळूण / ओंकार रेळेकर)
चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कुलच्या मार्कंडी, पाग,सावर्डे येथील मुलांच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सौ. सायली अमोल भोजने तथा कोकणातील प्रतिथयश उदयोगपती अँड. अमोल चंद्रकांत भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. २३ डिसेंबर रोजी शाळेच्या भव्य पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या कार्यक्रमाला उदघाटन प्रसंगी इंडियन सायंटिफिक एजयुकेशन सोसायटीचे प्रमुख उदयोजक चंद्रकांत भोजने,व्हाईस चेअरमन सौ सुवर्णा च. भोजने एसीबी इंटरनॅशनल स्कुलचे चेअरमन सौ.सायली अमोल भोजने संचालक अँड.अमोल चंद्रकांत भोजने,संचालक सौ.पूजा शुभम खताते, मुख्याध्यापक राकेश भुरण, पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे, क्रीडा शिक्षक अमित पांचाळ, समन्वयक, ओंकार रेळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कूलच्या झालेल्या स्पर्धेत एसीबी इंटरनॅशनल प्लेस्कूल मार्कंडी, पाग, सावर्डे येथील जुनिअर केजी आणि सिनिअर केजीच्या विदयार्थ्यांनी मोठ्या उत्साहात क्रिडा स्पेर्धमध्ये सहभाग घेतला. स्कूलच्या भव्य अशा एकूण दोन पटांगणामध्ये धावणे अडथळा शर्यत, वस्तू जमविणे रस्सीखेच, डोक्यावर पुस्तक स्थिर ठेवून चालणे इत्यादी क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. विविध क्रिडा स्पर्धेमध्ये विजयी सर्वच वर्गातील बाल विदयार्थ्यांना गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच क्रिडा स्पर्धेचे समालोचन आयशा सरगुरोह यांनी केले. कौन्सिलर मुद्रा वाजे, मार्कंडी प्ले स्कूल शेख मॅडम, पाग प्ले स्कूल अकसा मॅडम, सावर्डे प्लेस्कूल आणि सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद आदिंनी संपूर्ण स्पर्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.