(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सर्व बसेसमध्ये प्रवासी आता तिकिटासाठी यूपीआयद्वारे पैसे देऊ शकतात, असे एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
बस भाड्याचे डिजिटल पेमेंटसाठी एसटी महामंडळाने जुन्या तिकीट मशिनच्या जागी अँड्रॉइड उपकरणे आणली आहेत, असे महामंडळाच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले. महामंडळाने वाहकांना जवळपास ३४ हजार अँड्रॉइड तिकीट मशीन दिल्या आहेत आणि हे उपकरण विविध डिजिटल पेमेंट सुविधांनी सुसज्ज आहेत. तिकीट मशीन क्यूआर कोड निर्माण करेल, जो प्रवासी त्यांच्या यूपीआय अॅप्लिकेशन्सवर स्कॅन करू शकतात आणि भाडे अदा करू शकतात, असे प्रवक्त्याने सांगितले.
या सुविधेमुळे प्रवाशांचे सुट्या पैशांवरून वाहकांसोबत होणारे वाद टळणार आहेत.