(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांच्या आँक्टोबर महिन्याच्या वेतनापोटी राज्य सरकारने २०० कोटी रुपये देण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. कोरोना काळात तर एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळात एसटीचे ६ हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न बुडाले होते. तर निधी नसल्याने कर्मचा-यांचे पगारही वेळेवर देत येत नाही अशी महामंडळाची स्थिती आहे.
राज्य सरकारने २०२२- २०२३ च्या अर्थसंकल्पात १ हजार ४५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. तर दर महिन्याचा पगार देण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. आता आँक्टोबर महिन्याच्या वेतनासाठी २०० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.