(चिपळूण / ओंकार रेळेकर)
खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील लाइफ लाईन समजल्या जाणाऱ्या एसटी स्टँडवर असलेली बोअरवेल मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे अशी माहिती एसटी स्टँड चे कर्मचारी यांनी रविवार दिनांक १४-०५-२०२३ रोजी माहिती दिली.
खेड एसटी स्टँड वर पर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात एसटी बस ये जा करत असतात तेव्हा या ठिकाणी वाहक चालक तसेच कर्मचारी आणि प्रवाशी यांना पाणी मोठ्या प्रमाणात लागतो. पण सध्या असलेली बोअरवेल ही बंद असल्याने त्यांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. त्याला पर्याय म्हणून एक पाण्याचा टँकर उपलब्ध केला जातो. पण हे पाणी खूपच कमी असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अशी माहिती जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नितिन सखाराम जाधव यांच्या कडे एसटी कर्मचारी श्री उमेश खेडेकर यांनी मांडली होती.
या विषयाचे गांभीर्य ओळखून नितिन जाधव यांनी सस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडे चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी आणि कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने खेड तालुक्यातील जलदुत खालिद भाईंच्या कानावर घातला. खालिदभाईंनी जराही वेळ न घेता ज्या ठिकाणी बंद असलेली बोअरवेल पाहणी करण्याचे आदेश खेड तालुक्यातील प्रख्यात बोअरवेल चे काम करणारे नाडकर यांना देऊन लगेच त्या ठिकाणी काय करावे लागेल याची माहिती घेऊन त्याचे अंदाजपत्रक तयार करायला सांगितले.
सोमवार दिनांक १५-०५-२०२३ रोजी सकाळी बोअरवेल चालक नाडकर यांनी एसटी स्टँड वर असलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन बंद अवस्थेत असलेल्या बोअरवेल ची पाहणी करून त्याचे अंदाजपत्रक तयार करून ते जलदुत श्री खालिद भाई चौगुले यांच्याकडे पाठवण्यात आला. त्याअगोदर हे काम करायचे असल्यास त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचे पत्र ही सोबत घेतल्याने हे काम लवकर पूर्ण होईल अशी शक्यता निर्माण झाली. खालिद भाईंच्या माध्यमातून या कामाला आर्थिक तरतूद जमा करायची हालचाल सुरू झाली आणि सोमवार दिनांक १५-०५-२०२३ रोजी दुपारी ०३ वाजता या कामाला आर्थिक मदत करणारे दानशूर मिळाल्याने लगेच हे काम पूर्ण करायचे असे खालिदभाई तसेच नितिन जाधव यांनी ठरवल.
अंदाजपत्रक मिळाल्यावर लगेच ही गोष्ट खेड तालुक्यातील भोस्ते जसनाईक मोहल्ला येथील सुपुत्र अब्दुल रझाक जसनाइक यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी आपल्या स्वर्गीय पत्नीच्या स्मरणार्थ हे काम करून घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि होणारा खर्च मी लगेच ट्रान्स्फर करतो असे सांगितले.
अब्दुल रझाक जसनाईक यांची पत्नी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग च्या शाळेत प्राध्यापक म्हणून काम करत होत्या आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होवो यासाठी एसटी स्टँड वरील काम करायचं आहे अशी माहिती अब्दुल रझाक जसनाईक यांनी दिली नितिन जाधव यांनी ताबडतोब मुंबई मधून गावाकडे जाण्याचे नियोजन केले आणि हे काम जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या निगरानी खाली होईल यासाठी खेड एसटी स्टँड वर मंगळवार दिनांक १६-०५-२०२३ रोजी सकाळी ०९ वाजता पाहणी करून त्या ठिकाणी असलेल्या तांत्रिक अडचणी एसटी डेपो चे अधिकारी नंदकुमार जाधव तसेच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या.
त्यानंतर काम सुरू होणार होते पण एसटी स्टँड वर असलेली प्रवाशी वर्दळ तसेच ये जा करणाऱ्या बस यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सायंकाळी चार नंतर काम करण्याचे ठरविले याच पद्धतीने हे काम ठरल्या प्रमाणे सायंकाळी चार वाजता सुरू झाले आणि बोअरवेल दुरुस्ती करण्याचे काम किमान दोन तासांनी समाप्त झाले . बुधवार दिनांक १७-०५-२०२३ रोजी सकाळी या ठिकाणी नवीन पंप लाऊन त्याला लागणारे सर्व नवीन साहित्य वापरण्यात आले आहे आणि या ठिकाणी सौरक्षणाच्या दृष्टीकोनातून बोअरवेल च्या सभोवताल बांधकाम करून ही बोअरवेल एसटी बस स्थानकच्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द केली जाईल .
हे काम करत असताना खालिद भाईंचे मोठे बंधू अब्दुल्ला उमर चौगुले तसेच जल फाउंडेशन चे (संस्थापक अध्यक्ष) नितिन जाधव शिक्षक कर्मचारी परेश खोपडे गुरुजी, पत्रकार देवेंद्र जाधव – प्रहार, अनुज जोशी – पुढारी , बुवा जंगम – सागर तसेच माझं कोकण , राजू चव्हाण – तरुण भारत, मकसुद नाडकर, ठेकेदार प्रशांत सावंत , कमलेश चव्हाण, अजिंक्य शिर्के हे सर्व उपस्थित होते.
हे काम फक्त तीन दिवसांत मार्गी लावून आम्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी खालिद भाई चौगुले तसेच जल फाउंडेशन चे नितिन जाधव आणि मकसुद नाडकर पत्रकर बंधू यांचे आभार व्यक्त केले.