(संगमेश्वर)
रत्नागिरी विभाग एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली होती. या निवडणुकीची मतमोजणी आज रत्नागिरी येथे पार पडली. पतसंस्था निवडणुकीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने सर्वच्या सर्व अकरा जागांवर विजय मिळवून आपली जिल्ह्यात असणारी ताकद दाखवून दिली आहे. पतसंस्थेतील विजय हा कामगारांचा विजय असून कामगारांच्या हितासाठी पतसंस्था ताकतीने काम करेल असे नवनिर्वाचित सदस्यानी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी विभाग एस टी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पुढील पाच वर्षां साठी संचालक पदाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. जिल्ह्यातील ११ जागांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने आपल्या पॅनलमार्फत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. उमेदवारांनी जिल्हाभर फिरून सदस्यांना भविष्यात पतसंस्थेमार्फत कर्मचारी हिताचे निर्णय घेऊन पतसंस्था फायद्यात आणण्यासाठी केलेल्या नियोजनाची प्रचारादरम्यान माहिती दिली होती.
पतसंस्थेच्या जिल्ह्यातील बहुसंख्य सदस्यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या सर्व उमेदवारांवर विश्वास दाखवत त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. आज झालेल्या मतमोजणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला पर्याय नाही असेच चित्र दिसून आले . संगमेश्वर मधून कामगार संघटनेचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय उमेदवार समीर शिंदे हे विजयी झाल्याने त्यांच्यासह महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या सर्व विजयी उमेदवारांचे संगमेश्वर तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना या पॅनलचे विजयी उमेदवार : अभय जुवळे , अनिल चव्हाण, उमेश खेडेकर, रमेश राठोड, समीर शिंदे, निलेश इंदुलकर, सचिन वायंगणकर, आरिफ काझी, दीप्ती झेपले, मनाली साळवी