(संगलट / वार्ताहर)
खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजची इ.११वीची विद्यार्थिनी कु.अफशीन शकील अहमद चौगले हिला आर.आर कबेल कंपनीमार्फत इ.१०वी मार्च-२०२३ च्या परीक्षेत 83% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याबद्दल तिला पुणे येथे रुपये 10 हजारांची शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. तिचे वडील एक नामवंत वायरमन असून अशा क्षेत्रात कार्य करणाऱ्या पालकांच्या गुणवंत पाल्यांना कंपनी सन्मानित करते.
तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सर, सर्व संस्थासदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.