NPS सबस्क्राइबरच्या मृत्यूनंतर खात्यात जमा आलेल्या रक्कमेसाठी नॉमिनी पात्र असतो. परंतु, काहीवेळा NPS ग्राहक नॉमिनी निवडत नाही आणि त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे PFRDA ने आता नॉमिनीशी संबंधित नियम स्पष्ट केले आहेत. भविष्यातील आर्थिक गरज भागवण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करतो. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये पैसे गुंतवण्यास अनेक जण प्राधान्य देतात. गुंतवणूक करणाऱ्या सबस्क्राइबरच्या मृत्यूनंतर पैसे त्याच्या नॉमिनीला दिले जातात. अशात पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने नवीन नियम जारी केला आहे.
याबाबत, PFRDA ने 22 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, फक्त सबस्क्राइबरच नॉमिनीची निवड करू शकतो. NPS अंतर्गत समाविष्ट असलेल्या सदस्यांचे हित जोपासण्यासाठी सेवा रेकॉर्डमध्ये नोंद असलेला नॉमिनीला प्रभावी करण्यासाठी एक्झिट रेग्युलेशन अंतर्गत विशेष तरतुदी करण्यात आल्याचे म्हटले आहे. यासह परिपत्रकात, सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रे, POPs आणि NPSTs, दावा प्रक्रियेत गुंतलेल्या विविध मध्यस्थांना मदत करण्यासाठी या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
नवीन नियमानुसार, मृत सदस्याच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून सबस्क्राइबरच्या मृत्यूनंतर नॉमिनीमध्ये फेरबदल करता येणार नाही. मृत्यूपूर्वी सबस्क्राइबरने केलेले नॉमिनीच वैध राहतील. त्यानुसारच दावा प्रक्रिया पुढे जाईल. अवैध नॉमिनी निर्गमन विनियम 3(c) आणि 4(c) मध्ये परिभाषित प्रकरणासाठी संबंधित लवादाद्वारे प्रक्रिया पार पाडत निधी सबस्क्राइबरच्या कायदेशीर वारसांना दिला जाईल.
दरम्यान, नियम 3(c) हा सार्वजनिक क्षेत्रातील सदस्य आणि नियम 4(c) हा कॉर्पोरेटसदस्यासाठी लागू आहे. अशात नॉमिनी नियुक्त न करता सबस्क्राइबरच्या मृत्यू झाला असेल, अशा परिस्थितीत कर्मचार्याचा कोणताही नॉमिनी नियोक्त्याच्या नोंदींमध्ये आढळल्यास त्याचा विचार केला जाईल. NPS साठी नामनिर्देशित म्हणून आणि त्याला सर्व फायदे दिले जातील. यासाठी सिस्टीम इंटरफेसमध्ये, कर्मचार्याच्या सेवा रेकॉर्डमध्ये नामांकित व्यक्ती अस्तित्वात आहे आणि त्याला सर्व फायदे दिले जात आहेत, असे नियोक्त्याने घोषित करणे आणि प्रमाणित करणे आवश्यक असेल. OS च्या बाबतीत देखील, कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीमध्ये बदल केल्यास ते अवैध मानले जाईल.