(राजापूर)
गेल्या काही वर्षात कोकणावर आलेली नैसर्गिक आपत्ती, तसेच कोरोनासारख्या जीवघेणा आजारात जनेतेचे अश्रु पुसायला न येणारी एनजीओ मंडळी कोकणातील प्रत्येक प्रकल्पाविरोधात जनतेची माथी भडकविण्यासाठी मात्र आवर्जुन येतात. अशा ढोंगी एनजीओंचा बुरखा फाडण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी केले आहे.
रिफायनरी प्रकल्पाला कोकणातून सध्या चांगला पाठींबा लाभत आहे. कोकणातील बेरोजगारी दूर करण्यासाठी रिफायनरी प्रकल्प महत्वाची भुमिका बजावू शकणार आहे. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष देखील रिफायनरीचे समर्थन करीत आहेत, दुसरीकडे काही एनजीओ मात्र रिफायनरीच्या विरोधात अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल करत असून अशा ढोंगी एनजीओंवर आमदार राजन साळवी यांनी जोरदार टिका केली आहे.
कोकणच्या संकटकाळात न दिसणारी ही मंडळी कोकणात एखादा प्रकल्प येवू घातला की प्रकल्पाचा निसर्ग, पर्यावरण, मच्छीमारी यांच्याशी संबंध जोडून जनतेमध्ये भितीचे व प्रकल्पाविरोधी वातावरण तयार करतात. अशा ढोंगी, कावेबाज लोकांचे खरे रुप पुढे आणण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे असे आवाहन आमदार साळवी यांनी केले आहे.