(रत्नागिरी)
एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अँड. प्रशांत जाधव यांची निवड झाली आहे. शिर्के प्रशालेत कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक म्हणून जाधव हे परिचित आहेत. मायबाप बालसेवा फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक असलेले जाधव यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ समाजकार्य केले आहे.
एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनकडून देशभरात विविध व्यावसायिक कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रम आणि सुमारे ३३ क्रीडाप्रकारातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. अभ्यासक्रम व क्रीडाप्रकारांमुळे विद्यार्थ्यांना खूपच फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. क्रीडाप्रकारातील स्पर्धेबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमदेखील फाउंडेशनकडून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात तालुका, जिल्हा व राज्य तसेच देशपातळीवर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांची निवडचाचणी २० जुलैपर्यंत घेण्यात येणार असल्याचे समजते. या स्पर्धांमध्ये १२ ते २५ वयोगटातील कोणत्याही स्पर्धकांना प्रवेशशुल्क आकारून सहभागी करून घेतले जाणार आहे. ज्युडो, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, बॉक्सिंग आदी खेळांचा समावेश आहे.