( दापोली )
यंदाच्या नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मधमाशी दिवसाचे औचित्य साधत एजी हायस्कूल दापोली १९९१ च्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन श्री बिपीन मयेकर अमेय लॅबोरेटरी यांच्या मळे वणोशी येथील फार्मवर अतिशय उत्साहात साजरे केले. नोकरी धंदासाठी देशाच्या विविध राज्यांत तसेच परदेशात विखुरलेले ४० माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी दापोलीत आले होते.
मधमाशीचे शेतीविषयातील महत्व आणि गरज या विषयावर एजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि डॉ.बाळासाहेब कोंकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल माळी यांनी ४० शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या निमित्ताने शेतकऱ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून विविध फळझाडे आणि दैनंदिनी भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाला मळे, वणोशी गावचे सरपंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
संध्याकाळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात माजी विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गाणी गायली, डान्स केले आणि एक नाटिका सादर केली. गेट टुगेदरचा कार्यक्रम हा केवळ मौजमस्ती पुरताच मर्यादित न ठेवता आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार याठिकाणी या विद्यार्थ्यांनी रुजवला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन एजी हायस्कूल दापोली १९९१ माजी विद्यार्थी व्हॉट्सप गृपचे एडमिन श्री. अजय शिर्के, सौ. अदिती ओक-लिमये आणि सौ श्वेता भोसले- राणे यांनी श्री बिपीन मयेकर, श्री. संदिप सावंत, श्री.निलेश तेरेदेसाई श्री. संजय फडके श्री.मंदार सैतवडेकर, श्री.सतीश वनगे आणि सौ.हिना मुंदडा यांच्या मदतीने केले. शेतकरी मेळाव्यासाठी लागणारी आर्थिक मदत सावित्री इरिगेशनचे मालक श्री. वैभव कदम यांनी केली.