भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आज रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर आशिया चषक 2023 च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पाच चेंडूंत चार विकेट्स घेतल्या. प्रथम गोलंदाजी करण्यास भाग पाडलेल्या भारताने सिराजच्या नवीन चेंडूवर लंकेच्या आघाडीच्या फळीचे तुकडे केले. सिराजने प्रथम पथुम निसांकाला बाद केले आणि त्यानंतर चारिथ असालंका, सदीरा समरविक्रमा आणि धनंजया डी सिल्वा यांच्या विकेट्स घेत श्रीलंकेला चार षटकांत पाच बाद 12 धावांवर आणून ठेवले.
मोहम्मद सिराजने आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात चार विकेट घेत भारताला दमदार सुरुवात करून दिली. सिराजने दुसऱ्या षटकात एकही धाव दिली नाही. त्याने मेडन ओव्हर टाकले. मात्र चौथ्या षटकात चार विकेट घेत, त्याने या सामन्यात भारताला खूप पुढे नेले आहे. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने पथुम निसांकाला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले. यानंतर त्याने एकाच षटकात आणखी तीन बळी घेण्याचा पराक्रम केला.
मोहम्मद सिराजने तीन षटकांच्या स्पेलमध्ये 5 विकेट घेत आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. सिराजने आपल्या दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला एलबीडब्ल्यू आऊट केले. चौथ्या चेंडूवर त्याने चरित असलंकाला इशान किशनकरवी झेलबाद केले. शेवटच्या चेंडूवर सिराजने धनंजय डी सिल्वाला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले.
सिराजने घेतलेल्या विकेट
पहिली विकेट : चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने निसांकाला बाद केले. बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाने निसांकाला झेलबाद केले. त्याला चार चेंडूत केवळ दोन धावा करता आल्या.
दुसरी विकेट : या स्पर्धेत चमकदार फलंदाजी करणारी सदीरा समरविक्रमाही या सामन्यात अपयशी ठरली. चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तो सिराजने बाद केला. समरविक्रमा खाते न उघडताच एलबीडब्ल्यू आऊट झाला.
तिसरी विकेट : चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सिराजला तिसरे यश मिळाले. यावेळी त्याचा बळी चरित असलंका बनला. त्याने कव्हरच्या दिशेने एक शॉट खेळला आणि इशान किशनने अप्रतिम झेल घेतला. अस्लंका खाते उघडू शकले नाही.
चौथी विके़ट : धनंजय डी सिल्वा हा सिराजचा चौथा बळी ठरला. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डी सिल्वाला सिराजचा आऊटस्विंगर नीट खेळता आला नाही आणि चेंडू यष्टीरक्षक केएल राहुलच्या हातात गेला. डी सिल्वाने दोन चेंडूत चार धावा केल्या. त्याने चौकार मारला.
पाचवी विकेट : सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर सिराजने पाचवे यश मिळवले. त्याने वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच एका सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. यावेळी श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका सिराजचा बळी ठरला. शनाकाने चार चेंडूंचा सामना केला. तो खाते न उघडताच क्लीन बोल्ड झाला.-***3
सहावी विकेट : सामन्याच्या १२ व्या षटकामध्ये मोहम्मद सिराजने लंकेला मेंडिसच्या रूपात आणखी एक धक्का दिला. एका बाजून विकेट जात असताना संयमी खेळी करणाऱ्या मेंडिसला सिराजने क्लीन बोल्ड केले. मेंडिसने आपल्या खेळीत ३४ चेंडत १७ धावा केल्या.