(रत्नागिरी)
राष्ट्रीय स्तरावर काम करणारी मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या निवडणूका नुकत्याच गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी मध्ये झाल्या. मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. आनंद आंबेकर यांची बिनविरोध निवड झाली.
एकतिसावे मराठी समाजशास्त्र परिषदचे अधिवेशन संपन्न झाले. 2022 ते 2024 या दोन वर्षासाठी परिषदेची अतिशय अटितटीची निवडणूक झाली. मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. राहुल भगत, नागपूर यांची निवड झाली. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या समाजशास्त्र प्राध्यापकांमधून प्रत्येक विद्यापीठाचे प्रतिनिधी निवडले जातात.
मुंबईच्या कारखानीस कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. ज्योती पोटे मॅडम यांनी डॉ. आनंद आंबेकर यांचे नाव मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून सुचवले आणि प्रा. तुळशीदास रोकडे आणि प्रा. शिवाजी उकरंडे यांनी अनुमोदन दिले. डॉ. आनंद आंबेकर यांची मराठी समाजशास्त्र परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली. डॉ. आनंद आंबेकर गेली तेवीस वर्ष गोगटे जोगळेकर महाविद्यालयमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकांची भूमिका’ त्यांच्या पी.एच. डी. च्या संशोधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. समाजशास्त्र परिषदेच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल महाविद्यायातर्फे सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. प्रफुल्ल दत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, रजिस्टर श्री रवींद्र केतकर, समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.तुळशीदास रोकडे ,सहकारी प्रा. शिवाजी उकरंडे आणि प्रा. सचिन सनगरे उपस्थित होते. सदर नियुक्ती बद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सर्व सहकारी प्राध्यापकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.