(पाचल / तुषार पाचलकर)
राज्यभर आज गुरुवार दिनांक 14 डिसेंबर पासून शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समिती व राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी यांनी जुनी पेन्शन जशीच्या तशी मिळावी यासाठी बेमुदत संप पुकारलेला आहे. यात राजापूर तालुक्यातील सरस्वती विद्यामंदिर, व कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथील सर्वच शिक्षकांनी सहभाग झाल्याने जवळपास 1400 च्या वर शिक्षण घेत असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक शाळेतून घरी सोडण्यात आल्याने विद्यार्थांमध्ये कुतूहल निर्माण झालं झाले. मात्र तरीही त्यांच्या चेहऱ्यावर सुट्टीचा आनंद झळकत होता.
“एकच मिशन जुनी पेन्शन” ही जिद्द असलेल्या या संपामध्ये रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ, रत्नागिरी जिल्हा शिक्षक भारती संघ, रत्नागिरी जिल्हा शिक्षकेत्तर संघ, प्रयोगशाळा सहाय्यक संघ व इतर संघटना यामध्ये सामील झालेल्या आहेत.