(रत्नागिरी)
महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना म्हणजेच मस्ट संघटनेचा शासकीय संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. एकच मिशन जुनी पेन्शन एकच प्रमुख अजेंडा घेऊन मस्ट संघटनेने गेले तीन वर्ष रचनात्मक लढा दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच पार पाडलेल्या शिक्षक मतदार संघ विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सत्यजित तांबे यांना जाहीर पाठिंबा देऊन जुनी पेन्शन सुरू करावी यासाठी विशेष लक्ष देण्यासाठीच आमदारकीच्या निवडणुकीत मस्ट संघटनेने पाठिंबा दिला होता. आणि पहिल्या दिवसापासून ज्ञानेश्वर म्हात्रे आणि सत्यजित तांबे या अभ्यासू शिक्षक प्रतिनिधींनी विधान परिषदेमध्ये अभ्यासपूर्ण जुन्या पेन्शन योजनेचा लढा सुरू केला आहे. म्हणूनच काम बंद संपामध्ये न उतरता कृतिशील पाठिंबा देण्यावर भर दिला आहे.
कोरोना काळातील ऑनलाईन परीक्षेनंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या वर्षी ऑफलाईन परीक्षा देताना खुप कसोटी लागत आहे परीक्षा सुरू असताना अश्या कठीण प्रसंगी परीक्षेवर बहिष्कार नटाकण्याबाबत मस्टचे अध्यक्ष डॉ.विजय पवार महासचिव डॉ. निर्मला पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय कार्यकारी समितीची मीटिंग झाली त्या मिटींगला राज्यस्तरीय कार्यकारी सदस्य डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होते. कृतिशील काम करण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने शासन दरबारी नवनियुक्त शिक्षक मतदार संघाच्या आमदारांवरती विश्वास ठेवून पुढील लढा देण्याचे ठरवले आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्याल रत्नागिरी येथील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. सीमा कदम, डॉ. आनंद आंबेकर डॉ. दानिश गनी, प्रा.वासुदेव आठल्ये कृतिशील पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.