(मुंबई)
ऋतुजा लटके यांचा राजीनामा प्रकरण अडचणीत आले असताना न्यायालयाने जर निर्णय ऋतुजा लटके यांच्या विरोधात निर्णय दिला तर शिवसेनेकडून हा प्लॅन बी तयार करण्यात आला असल्याचं सांगितले जात आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत नोकरीला असून त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र मुंबई महापालिकेने अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर केला नसल्याने त्यांची उमेदवारी आयत्या वेळी धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी अन्य पर्याय पुढे येत आहेत.
दरम्यान आता ठाकरे गटाकडून या जागेसाठी तीन नवीन उमेदवारांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. या नावांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय यांची नाव आहेत. यासोबत लटके यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीचे नावही चर्चेत आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांचे बंधू सुरेश लटके यांचे नावही पुढे आले आहे. शिवसेना नेते आणि लटके कुटुंबीय यांचे या उमेदवारी बाबत एकमत झाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनाम्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असताना न्यायालयाने जर निर्णय ऋतुजा लटके यांच्या विरोधात निर्णय दिला तर शिवसेनेकडून हा प्लॅन बी तयार करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांचा राजीनामा मंजूर होण्यास साधारण ३० दिवसांचा काळ लागणार असल्याचे मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं असल्याने आता संभ्रम वाढला आहे.