(ज्ञान भांडार)
सध्या प्रखर उन्हाळा चालू आहे. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करु लागले आहेत, ज्यामुळे शरीराला थंडावा मिळेल. अशावेळी सर्वच लोक पाणी जास्त पिऊ लागतात, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही. तसेच लोक उन्हाळ्यात आपला आहार देखील बदलतात आणि त्यामध्ये अशा गोष्टींचा समावेश करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला पाणी मिळेल आणि शरीर थंड राहण्यास मदत करेल.
उन्हाळ्यात लोक उसाचा रस पिणं हा देखील उष्णतेपासून वाचण्याचा चांगला पर्याय समजतात. परंतु फक्त थंडाव्यासाठीच नाही तर ऊसामुळे अनेक आजार देखील दूर राहण्यास मदत होते. यकृत, रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. उसाचा रस पचनास मदत करतो, उसाच्या रसामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराच्या पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हा रस शरीराची पचनक्रिया बरोबर ठेवण्यासोबतच पोटाच्या संसर्गापासून देखील आपला बचाव करतो.
मधुमेहांच्या रुग्णांनी उसाचा रस प्यावा का?
उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेउ त्यांनी ऊसाच्या रसापासून दूर राहावे. ऊसाच्या रसामध्ये कोणतीही गोष्ट न मिसळता त्याच्यापासून रस काढला जातो, ज्यामुळे या रसात जास्त साखर आढळते. जे मधूमेह रुग्णांसाठी चांगले नाही. उसाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते, पण साखरेचे प्रमाणही त्यात जास्त असते, त्यामुळे हा रस मधुमेहींसाठी आरोग्यदायी नाही. एक कप (240 मिली) उसाच्या रसामध्ये 50 ग्रॅम साखर असते, म्हणजेच ती 12 चमचे असते. उसाच्या रसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) आणि जास्त ग्लायसेमिक लोड (GL) असतो. याचा अर्थ तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा परिणाम होतो.
उसाचा रस दात मजबूत करतो
कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे उसाच्या रसात आढळतात, ज्यामुळे दात मजबूत होते. तसेच, ते दातांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. उसाच्या रसामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्याने श्वासाची दुर्गंध देखील थांबते.
उसाचा रस संसर्ग दूर ठेवतो
उसाच्या रसाचे सेवन केल्याने मूत्रमार्गाचे संक्रमण टाळण्यास मदत होते. विशेषत: लघवी करताना जळजळ होत असेल तर हा रस प्यायल्याने त्यापासून आराम मिळू शकतो.
उसाचा रस ऊर्जा वाढवतो
उसामध्ये सुक्रोजचे प्रमाण जास्त असते जे शरीराला चांगली ऊर्जा देण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवत नाही. हे शरीरातील ग्लुकोजचे प्रकाशन सामान्य करते, जे साखरेची पातळी पुनर्संचयित करण्यात मदत करते.
कावीळ
पीडित रूग्णांना उसाचा रस पिण्याची शिफारस डॉक्टर करतात. उसाचा रस कावीळमध्ये फायदेशीर आहे. ताजे उसाच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळल्यास अधिक फायदा होतो.
ताप
ताप असल्यास उसाचा रस सेवन करावा. ताजे उसाचा रस पिण्याने ताप लवकर कमी होतो.
पोटाचे विकार
पोटात वायूची तक्रार असल्यास आंबटपणाचा त्रास होतो. यामुळे शरीरात चिडचिड होते. उसाचा रस शरीर थंड करते. उसामध्ये फायबर असते, जे पोटाशी संबंधित समस्या दूर करते. बद्धकोष्ठता काढून पचन मजबूत करते. उसाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचेचा रंग सुधारतो. डाग आणि मुरुम चेहऱ्यावरुन काढून टाकले जातात. जर स्टोन चा त्रास असेल तर उसाचा रस प्यायला पाहिजे. नियमित सेवन केल्यास स्टोन विरघळतात.
ऊस रसापासून नुकसान
उसाचा रस फायदेशीर आहे परंतु त्याचे असंतुलित सेवन हानिकारक आहे. दररोज फक्त १ ग्लास उसाचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुम्ही जोरदार उन्हातून आला असाल आणि तुम्हाला घाम फुटत असेल तर उसाचा रस लगेच सेवन करू नका. यामुळे चक्कर येणे आणि उलट्या होऊ शकतात. बर्फात मिसळून उसाचा रस पिऊ नका. यामुळे पोटात थंडी पडण्याची शक्यता आहे. उसाचा रस ताजे प्यायला हवा. जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवलेला रस पिऊ नका. यामुळे शरीराला हानी पोहोचवू शकते.