(रत्नागिरी)
उलट्यांचा त्रास झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष ईश्वर मेहतो (२१, रा. पंचायत बाकोर, झारखंड, सध्या रा. जिलानी कंपनीजवळ, एमआयडीसी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे.
संतोष मेहतो हा जिलानी कंपनीत कामाला होता. त्याला १७ जून रोजी सकाळी ८:३५ वाजता उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला कंपनीच्या गाडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात नोंद केली आहे.