( चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील उर्दू माध्यमातील शिक्षकांसाठी सावर्डे पिंपळ मोहल्ला उर्दू शाळेत शिक्षण परिषद बुधवार दि. १९ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात अ. कादिर तांबे यांच्या हम्दपठणाने तसेच फय्याज सुर्वे यांच्या सुरेल आवाजात नआत पठणाने झाली.
पिंपळ मोहल्ला सावर्डे शाळेचे मुख्याध्यापक मुजाहिद मेयर यांनी सावर्डे बीट विस्तार अधिकारी सशाली मोहिते मॅडम, कार्यक्रम पर्यवेक्षक नसरीन खडस, अशफाक पाते, जयश्री गावडे, शिक्षण विभाग विषय तज्ञ गुणदेकर, मार्गदर्शक परवेझ चिपळूणकर, नाझिया दुंडगे, चिपळूण तालुका उर्दू शिक्षक संघटना अध्यक्ष ताज खान, सावर्डे जमातुल मुस्लिमीन अध्यक्ष इस्लामुद्दीन भोंबल, सावर्डे ग्रामपंचायत सदस्य मैनुद्दीन खलपे, सामाजिक कार्यकर्ते अ. कादिर भोंबल, उद्योजक तौसिफ खलपे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचे तसेच सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
अशा प्रकारे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उर्दू शिक्षण परिषद पार पडली.
उपस्थितांचे, व्यवस्थापन करणारे शिक्षक मुजाहिद मेयर, फौजिया कुरेशी, परवीन गडकरी, अस्मीना पांगारकर तसेच हुमेरा मॅडम यांनी उत्तम व्यवस्था केल्यामुळे नसरीन खडस यांनी आभार मानले.