(नवी दिल्ली)
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची त्याच्या एका मित्रानेच ४४ लाखांची फसवणूक केली आहे. शैलेश ठाकरे असे या मित्राचे नाव असून तो एकेकाळी उमेश यादवचा मॅनेजर असल्याचेही सांगण्यात येते.
प्लॉट घेऊन देतो म्हणून आरोपी शैलेश ठाकरे याने उमेश यादव कडून ४४ लाख घेतले होते, मात्र आरोपीने परस्पर स्वतःच्या नावाने प्लॉटची खरेदी करून घेतली. ज्यामुळे उमेशची ४४ लाखांची फसवणूक झाली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात आरोपी शैलेश ठाकरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे.