इक्बाल जमादार, संगलट (खेड )
आधीच अनंत अडचणी, आणि त्यात असलेले छतही हरपले त्या मुळे दापोली तालुक्यातील उन्हवरेतील मिसाळ कुटुंब बेघर झाले. या कुटुंबाची शेजारी राहण्याची व्यवस्था ग्रामस्थांनी केली मात्र दुसऱ्याचे ओसरीला किती दिवस रहायचे हा विचार मिसाळ कुटुंबाला सतावू लागला. ‘मेलो तर आपल्या जागेत’ असा विचार करून ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या जागेवर झोपडी उभी करून याच झोपडीत मिसळ कुटुंब गुजारा करत आहेत. त्यामुळे आता तरी मिसाळ कुटुंबाची शासनाला कणव येईल का? अशी विचारणा आता मिसाळ कुटुंबाकडून शासनाला होत आहे.
तौक्ते वादळात उन्हवरे भोईवाडीतील गंगाराम गोविंद मिशाळ आणि निर्मला गोविंद मिशाळ या वृद्ध दांपत्याचे रहाते घर कोसळले. सुदैवाने दोघांचेही जीव वाचले पण निवारा तुटल्याने आहे त्यांचे जीणे अवघड झालं आहे. पत्याच्या झोपडी सारख घर त्यामुळे पुन्हा कधी बेघर होण्याची वेळ येईल सांगता ही येत नाही. दापोली तालुक्यातील उन्हवरे भोईवाडी येथील हे कुटुंब अनेक वर्षे चिखल मातीच्या घरात निवारा करत आहे. शासनाच्या विविध घरकुल योजना आल्या. या योजनेच्या लाभ श्रीमंतांनाही मिळाला मात्र अनेक वर्षे भोई समाजाचे हे गरीब कुटुंब घरकुल वाचून वंचित राहिले ते आजही.
येथील ग्रामस्थ या कुटुंबाला सहकार्य करत आहेत आणि या कुटुंबाला शासनाने तातडीने घर द्यावे अशी ही विनंती करत आहेत. या मिसाळ कुटुंबाला घर मिळावे आणि तातडीची मदत मिळावी म्हणून दापोलीतील पत्रकारांनी दापोली तहसीलदार यांना विनंतीही केली.