( आरोग्य )
उन्हाळ्यात उसाचा ताजा आणि थंडगार रस पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्याचे खूप नुकसान होते. उसाचा रस हा शरीरात असलेल्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जगभरात सर्वात जास्त ऊस हा भारतात तयार केला जातो. उसाचा रस जास्त प्यायल्यास शरीरात संसर्गजन्य शक्ती वाढण्यास मदत होते. उसाचा रस फक्त तुमचा गर्मी पासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारापासून नही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते.
उसाचा रस हा एक अतिशय स्वस्थ आणि फायदेशीर पेय आहे. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक तत्वे असतात. ते हाडे मजबूत करतात आणि दातांची समस्या देखील कमी करते. त्याचबरोबर या रसात कर्करोग आणि मधुमेहासारख्या प्राणघातक रोगांशी लढण्याची शक्ती देखील असते.
काही लोकांना उसाच्या रसातील हा नैसर्गिक गोडवा आवडत नाही. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात आणि कृत्रिम गोडवा असलेल्या कोल्ड्रिंक्सकडे वळतात. मात्र कोल्ड्रिंक्समध्ये असणारे केमिकल आपल्या शरीराला हानीकारक असतात. या उलट उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे पोषक असतात. गर्भवतींसाठी हे खूप उपयोगी आहे. उसाचा रस फक्त गर्मी पासून बचाव करीत नाही तर बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतो.
उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशन ची भीती सतत असते. उसाचा रस पिल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो. उसाचा रस पिण्याचे काय फायदे आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
उसाचा रस पिण्याचे फायदे…
1) कृत्रिम थंडपेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खुप आहेत. या उलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
2) उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.
3) उसाचा रस लिव्हरसाठी खूप लाभदायक असतो. कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्ल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.
4) उन्हाळ्यात डीहायड्रेशन ची भिती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो.
5) उसाचा रस खोकला, दमा, मूत्र रोग, आणि किडनीशी संबंधित रोगावर फायदेशीर आहे.
6) उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधी पासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. त्यामुळे दातांना होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.
7) उसाच्या रसाचे सेवन केल्याने पोटासंबंधीचे सर्व रोग दूर होतात. या रसामुळे अपचनाची समस्याही दूर होते.
8) उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्कीनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
9) उसाचा रस ऊर्जेचा बनवतं.यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.
10) उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त एक ते चार वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.
11) उसाचा रस तुम्हांला तुमची किडनी चांगली ठेवण्यासाठी मदत करते. उसाचा रस प्यायल्याने लघवी ही साफ होते. त्यामुळे मूतखडासारखे आजार होत नाहीत.