उन्हाळा खूप त्रासदायक असतो. या ऋतूमध्ये पारा झपाट्याने चढतो, त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. वाढत्या तापमानाचा परिणाम किडनीवरही होतो. उष्णता आणि आर्द्रता किडनीसाठी घातक ठरते. उन्हाळ्याला अनेकदा किडनी स्टोन सीझन म्हटले जाते, कारण घामामुळे आपले शरीर झपाट्याने डिहायड्रेट होते. डिहायड्रेशन हे किडनी स्टोनचे एक सामान्य कारण आहे.
मुतखडा होणं ही एक कॉमन समस्या बनत चालली आहे. मात्र. योग्य उपचाराने मुतखडा लवकर बरा होऊ शकतो. शरीरातील खनिजे आणि क्षार जेव्हा स्टोनचे रूप धारण करतात तेव्हा त्याला आपण मुतखडा झाला म्हणतो. हे बहुतेक खडे मुगाच्या दाण्याएवढे असतात, परंतु कधीकधी ते वाटाण्यापेक्षाही मोठे असू शकतात. शरीरात पाण्याची कमतरता हे मुतखडा होण्याचे मुख्य कारण आहे. संशोधनानुसार, यूरिक अॅसिड राखण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. पाणी कमी पिणे हे अनेकदा किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण असते.
व्हिटॅमिन-डी किंवा कॅल्शियम सब्स्टीट्यूट दीर्घकाळ घेतल्यास शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मुतखडे होऊ शकतात. वाढलेला लठ्ठपणा, कमी झालेली शारीरिक हालचाल, उच्च रक्तदाब आणि शरीरात कॅल्शियमचे कमी झालेले शोषण यामुळेही मुतखडे होऊ शकतात. जास्त मीठ किंवा प्रथिनयुक्त आहार जसे की मटण, चिकन, चीज, मासे, अंडी, दूध यामुळे देखील मुतखडा होऊ शकतो. मुतखडा झाल्यास दररोज 15 ते 20 मिनिटे व्यायाम करावा.
किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपले रक्त शुद्ध करतो. किडनी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. किडनी इलेक्ट्रोलाइट्सची पातळी नियंत्रित करते. किडनीद्वारेच शरीरात मीठ, पाणी आणि खनिजे संतुलित राहतात. किडनीमध्ये असलेले लाखो फिल्टर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतात.
उन्हाळ्यात का वाढते मुतखड्याची समस्या
80 टक्के किडनीच्या समस्या कॅल्शियममुळे होतात. लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. अपुर्या पाण्यामुळे लघवी एका जागी साचून किडनीमध्ये स्टोनचे रूप घेते. उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि अपुरे पाणी प्यायल्यास किडनी स्टोनची समस्या वाढते. उन्हाळ्यात आपण काय खातो यालाही खूप महत्त्व आहे.
आंबट पदार्थांमुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते, या पदार्थांमध्ये मीठ, प्रोटीन आणि साखर जास्त असते, जे किडनी स्टोनची समस्या वाढवू शकते. उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल तर आहारात काही बदल करणे गरजेचे आहे.
– आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. जास्त मीठ खाल्ल्याने लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण वाढते.
– उन्हाळ्यात चहा-कॉफीचे सेवन कमी करा. कॅफिनच्या अतिसेवनामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते.
– जास्त पाणी प्या. तुम्ही किती पाणी पितात याची काळजी घ्या. जास्त पाणी पिणे किडनी डिटॉक्स करण्यासाठी प्रभावी ठरते.
– आहारात द्रव पदार्थांचे जास्त सेवन करा. ताक, लस्सी, ज्यूस, लिंबूपाणी यांचे सेवन केल्याने किडनी निरोगी राहते.
– लघवी नियमित तपासा. तुम्ही किती वेळा लघवी करतात याचा मागोवा घ्या.
लघवीचा प्रवाह कसा आहे हे देखील तपासा.
– लघवी रोखू नका. मूत्राशय नियमितपणे रिकामे ठेवा. लघवी रोखून ठेवल्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.
मुतखड्यावरील घरगुती उपाय –
सफरचंद व्हिनेगर –
सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये सायट्रिक अॅसिड चांगल्या प्रमाणात असते, जे किडनी स्टोनचे लहान तुकडे करण्याचे काम करते. दोन चमचे व्हिनेगर कोमट पाण्यासोबत घेतल्याने मुतखड्याच्या समस्येत खूप आराम मिळतो.
ऑलिव्ह आणि लिंबू –
लिंबाचा रस मुतखडे फोडण्यास मदत करतो आणि ऑलिव्ह ऑइल मुतखडा बाहेर काढण्यास मदत करतो. एक ग्लास पाण्यात लिंबू आणि ऑलिव्ह ऑईल टाका. नीट मिक्स करून प्यायल्याने काही वेळात मुतखडा निघून जाऊ शकतो.
डाळिंबाचा रस –
मुतखड्याच्या समस्येवर डाळिंब जास्त चांगले काम करते. त्याचा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि किडनी स्टोनमध्ये खूप आराम मिळतो.
कडुलिंब –
कडुलिंबाची पाने जाळून भस्म बनवा आणि रोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा पाण्यासोबत घ्या.
Kalanchoe pinnata –
पाथर चट्टा (Kalanchoe pinnata) वनस्पती कुठेही सहज सापडते. एका पानात थोडी साखर घालून बारीक करा. दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्यास मोठमोठे खडे देखील काही वेळात बरे होतात.
कुळीथ –
जर मुतखडे लहान असतील तर कुळीथ डाळीचे सेवन केल्याने अनेक वेळा खडे आपोआप वितळतात आणि बाहेर पडतात.
मुतखडा झाल्यावर काय खाऊ नये
1. खारट पदार्थांचे सेवन अगदी कमी करावे. कारण खारट पदार्थांमध्ये सोडियम आढळते ज्यामुळे मुतखड्याचा धोका आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत लोकांनी फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकबंद फूड यापासून जितकं शक्य होईल तितकं दूर राहावे.
2. मुतखड्याची समस्या असल्यास, खजूर आणि रास्पबेरीसारख्या फळांचे सेवन टाळावे. त्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण आढळते.
4. काही भाज्यांचे सेवन केल्यानेही किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. पालक, बटाटा, बीटरूट आणि गाजर यांसारख्या भाज्यांचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये आढळणाऱ्या ऑक्सॅलेट्समुळे मुतखड्यांचा धोका अधिक वाढू शकतो.