(लांजा/रुबिन मुजावर)
मे महिन्याचा सध्या असह्य होणारा उकाडा, या उष्म्यात थोडासा थंडावा हवा असेल तर नक्कीच तुम्ही कुठच्यातरी थंड हवेच्या ठिकाणी जाता. मात्र लांजामध्ये एका ठिकाणी आजही एक मोठा धबधबा प्रवाहीत आहे. हा धबधबा मुळात एका धरणाच्या पाण्यामधून निर्माण झालेला आहे.
एप्रिल, मे, जून असे तीनही महिने हा धबधबा मोठ्या प्रवाहाने वाहत असतो. जर तुम्हाला उन्हाळ्यात धबधब्यावर मजा लुटायची असेल तर नक्कीच एकदा या धबधब्याला भेट द्या. याठिकाणी आजही कोल्हापूर संगमेश्वर चिपळूण सिंधुदुर्ग येथून अनेक पर्यटक भेट देत असतात. एकीकडे 38 डिग्री वातावरण आहे, त्यामध्ये हा प्रवाहीत धबधबा थोडाफार का होईना उन्हापासून शितलचा देणार आहे. म्हणून आपण लांजा तालुक्यातील वेरवली या ठिकाणी असलेल्या या धबधब्याला नक्कीच एकदा तरी भेट द्या !
येथील डोंगर-द-यांना कापत खळखळत खाली कोसळणारं पाणी बघितल्यावर कुणालाही टेन्शन फ्रि झाल्यासारखंच वाटेल. या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हालाही असंच टेन्शन फ्रि व्हायचं असेल, तर तुम्ही लांजा मधील या खास धबधब्याला भेट देऊ शकता. उन्हाळ्यातील सुट्टीचा उपयोग अथवा आठवड्यातील एक दिवस रिलॅक्स म्हणून लांजा तालुक्यातील वेरवली या ठिकाणी मौज मस्ती आणि आनंद लुटण्यासाठी एक वेळ अवश्य या ठिकाणाला भेट द्या