केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत कल्याणकारी योजनेतून उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून धान्य वाटप करण्यात येते. सदर योजना स्तुत्य आणि गरीब विद्यार्थ्यांना आधार देणारी आहे. परंतु विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष धान्य वितरित न करता त्याऐवजी धान्याच्या खर्च एवढी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे वाचनात आले.
खरं म्हणजे विशेषता ग्रामीण भागातील सर्वच लाभार्थी विद्यार्थ्यांची खाती बँकेत असतीलच असे नाही शिवाय आधार कार्ड नसल्यास मुलांची खाती उघडणे अवघडच. दिडशे ते अडिचशे रुपयाच्या अनुदानासाठी किमान प्रथम एक हजार भरून बालकाचे बँकेत खाते उघडावे लागणार ते गरीब पालकांना परवडणारे नाही. शिवाय जरी खाते उघडले तरी अशा खात्यातून सतत व्यवहार होत नसल्याने सातत्याने कमी शिल्लक म्हणून बँक दंड लावणार हे वेगळेच. संबंधित प्रशासनाने या समस्या समजून घेऊन पालकांना न परवडणाऱ्या व त्रासदायक ठरू शकणा-या या मार्गा ऐवजी विद्यार्थ्यांना थेट प्रत्यक्ष धान्य वाटप करण्यात आल्यास ते सोयीचे होईल का याचा विचार करावा असे वाटते.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !