(चिपळूण / ओंकार रेळेकर)
कोकणातील प्रतिथयश उद्योगपती तथा शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देणारे भाजपा ज्येष्ठ नेते उद्योजक डॉ.ओंकार हेर्लेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या कार्यकारणी मध्ये कोकण विभाग संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ.ओंकार हेर्लेकर यांचा लासा उद्योग समूह या नावाने कोकणात उद्योग समूह आहे. लोटे एमआयडीसी मध्ये त्यांचे काही कारखाने आहेत. कोरोना संक्रमण काळ, किंवा उदभवलेली नैसर्गिक आपत्ती या काळात त्यांचे मोठे मदत कार्य राहिले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोटे औद्योगिक वसाहतीतील लासा सुपरजेनिक कंपनीने मोठा हातभार लावला होता.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील लासा सुपरजेनेरिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कोकणातील सुप्रसिद्ध प्रतिष्ठित उद्योजक डॉ. ओंकार हेर्लेकर यांच्या संकल्पनेतून विविध ठिकाणी वर्षभर सामाजिक उपक्रम सुरूच असतात. या सोबतच त्यानी सामाजिक दायित्व म्हणून कोरोना काळात आर्सेनिक अल्बम- ३० चे १० हजार पॅकेट शासनाकडे सुपूर्द केल्या होत्या. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा राज्यपाल भवन येथे विशेष सत्कार केला होता.
डॉ.ओमकार हेर्लेकर यांची भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या कार्यकारणीमध्ये कोकण विभाग संयोजक म्हणून नियुक्तीचा कार्यक्रम पुणे येथे रविवार दिनांक २६-११-२०२३ रोजी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा नियुक्ती वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये, डॉ ओमकार प्रवीण हेर्लेकर यांना उद्योग आघाडीमध्ये कोकण विभाग संयोजक म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. हा पद वितरण सोहळ्यासाठी भाजपा प्रदेशाअध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद वाकोडकर, आणि भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.