(रत्नागिरी)
राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी शिरगांव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या सौ.फरीदा रझाक काझी यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले. तसेच गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान सरपंच फरीदा काझी व माजी सरपंच रझाक काझी यांनीही प्रोटोकॉल म्हणून पालकमंत्री ना. उदय सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले. या दौऱ्यात कोणत्याही प्रकारची राजकीय अथवा अन्य कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे सरपंच फरीदा काझी यांनी सांगितले आहे. दरम्यान निवडणूक संपली की, राजकारण संपायला हवे कारण सर्वांनी मिळून आता शिरगांवच्या विकासासाठी एकत्र काम करू या, असे पालकमंत्री ना उदय सामंत म्हणाले. या प्रसंगी बाबु म्हाप, राजन शेट्ये व वरिष्ठ पत्रकार अलिमियां काझी उपस्थित होते.