(रत्नागिरी)
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरोग्य विभाग जि.प. रत्नागिरी पुरस्कार वितरण व जिल्हास्तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण २०१३-१४ ते २०१८-१९ समारंभास कै. शामराव पेजे सभागृह, जि.प. रत्नागिरी येथे संपन्न झाला.
यावेळी जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, प्राथमिक आरोग्य केंद्रात, आरोग्य कर्मचारी यांना पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी रत्नागिरी मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, श्री.यादव, जिल्हा चिकित्सक फुले मॅडम, आरोग्य अधिकारी आठले आदी उपस्थित होते.