(रत्नागिरी)
रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील बहुतांश ग्रामपंचायतींचा निकाल आज लागला. या निकालानंतर ठाकरे गटाचे रत्नागिरी शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी 80 टक्के ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. ते म्हणाले, रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचं वर्चस्व होतं आणि राहिल्याचा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे.
आज लागलेल्या निकालात २२ पैकी ११ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सरपंच निवडून आले आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी दिली. यात कासारवेली, चांदोंर, टिके, तोंणदे, टेंब्ये, तरवळ, पूर्णगड फणसवळे, तरवळ, मावळंगे, भगवती नगर, मालगुंड या ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. निवळी, नेरूळ करबुडे, बोंडये या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर गावडे आंबेरे ग्रामपंचायतीत जास्त सदस्य ठाकरे गटाच्या शिवसेनेचे निवडून आलेत. परंतु, सरपंचपदी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. दरम्यान, निवडून आलेल्या सर्व सदस्य व सरपंचांचा उद्या ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे जाहीर सत्कार होणार असल्याचेही तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी सांगितले.
यावर जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे, २९ पैकी २३ ग्रामपंचायती या भाजप आणि शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे आल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने ८० टक्के ग्रामपंचायती जिंकल्याचा केलेला दावा हा निव्वळ दिशाभूल करणारा असल्याचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी सांगितले.
तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे भाजपच्या ५ ग्रामपंचायतींपैकी ३ या भाजपने राखल्या आहेत. भाजपकडील गणेशगुळे ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेली आहे. कासारवेळी, भगवतीनगर या ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे गेल्या आहेत. तर धामणसे, निवळी, गावडे आंबेरे, पिरदवणे भाजपकडे आल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये आपले सदस्य पाठवले. आता भाजपचे सदस्य वाढले. जिथे नव्हते तिथे भाजपने गावागावातून खाती उघडली आहेत. मालगुंड ग्रामपंचायतमध्ये ६ सदस्य ठाकरे गटाची शिवसेना तर ५ शिंदे गटाचे सदस्य निवडून आले आहेत. इथे काटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र सरपंच ठाकरे गटाच्या शिवसेनेचा निवडून आला आहे.