[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
रत्नागिरी तालुक्यातील मारुती मंदिर आनंद स्वीटच्या बाजूला असलेल्या “GK कॉस्मेटिक्स” या शॉपचे उद्या, बुधवारी (२२ मार्च रोजी) सकाळी साडेदहा वाजता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीमती गौरी सुरेश हर्षे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला श्रीमती शुभांगी साठे (अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी), श्रीमती जयश्री गायकवाड (अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी), संघमित्रा फुले गावडे ( सिव्हिल सर्जन), श्रीमती अर्चना अजित पून्नतलीकर (अध्यक्ष- सलून अँड स्पा असोसिएशन रत्नागिरी जिल्हा) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती श्री. कपिल हर्षे यांनी दिली आहे.