(मुंबई)
पंतप्रधान मोदी यांना उद्धव ठाकरे यांच्याप्रती आदर आहे. दोन पक्षातील संबंध सुधारण्यासाठी मी प्रयत्न केले होते. परंतु भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन झाल्यामुळे संबंध पुन्हा बिघडले. तर राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. शिवसेना एकत्र राहिली पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. बाळासाहेबांचे विचार कायम राहावेत यासाठी प्रयत्न करत राहू. जेव्हा आम्ही आसामला गेलो तेव्हा एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊ असं उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला सांगितले. पण भाजप तयार झाले नाही, असा घटनाक्रम व घणाघाती बॉम्ब केसरकर यांनी फोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, ‘पक्षाअंतर्गत लोकशाही असावी की नाही हे कोर्टाच्या निकालावरून कळेल. येत्या दोन-चार दिवसांत मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. विस्तार थोडा उशीरा झाला तरी चालेल, पण सुप्रिम कोर्टाचा आदर ठेवणं गरजेच आहे’. असेही ते म्हणाले.