(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मध्ये उत्कर्ष कोकण सेवा संघ, दापोली यांनी स्वामी विवेकानंद जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’ आणि थोर स्वतंत्र सेनानी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ आणि ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन कृषी महाविद्यालय,
या स्पर्धेमध्ये एकूण 17 स्पर्धक सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली कला सादर केली.
या वेळी कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.बी.जी.देसाई, डॉ.मोहित शिंदे, तर परीक्षक म्हणून डॉ.दिपक मळवे, डॉ. प्रविण झगडे, श्री.रोहित शिंगे तसेच इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि थोरांच्या प्रतिमेला हार घालून झाली.
सहयोगी अधिष्ठाता डॉ.बी.जी.देसाई यांनी आपल्या विचारांनी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले आणि अशेच कार्यक्रम आपण विद्यार्थ्यामार्फत आयोजित करत राहू अशे आश्वासनही दिले. सदर वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार आहे.