रत्नागिरी प्रतिनिधी :
⭕ संदेश जोशी, रमजान गोलंदाज यांचा कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज…
⭕ ग्रामपंचायत कारभाराची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याची केली मागणी…
🟫 रत्नागिरी तालुक्यातील उक्षी ग्रामपंचायतीमध्ये 2015 ते 2020 या कालावधीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे येथील ग्रामस्थ संदेश जोशी, रमजान गोलंदाज यांनी कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या भ्रष्टचाराची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
🟫 या तक्रार अर्जात त्यांनी पुढे म्हटले आहे की, उक्षी ग्रामपंचायतीच्या हद्दीत 2015-20 या काळात जी विकास कामे करण्यात आली ती विकास कामे इस्टीमेंटप्रमाणे न होताच त्याची एम. बी. करण्यात आली आणि ठेकेदाराला रक्कम अदा करण्यात आली. ती कोणत्या आधारे करण्यात आली याची चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असे तक्रारीत म्हटले आहे.
🟫 त्यांनी पुढे म्हटले आहे, गावातील ग्रामसभेचे आणि मासिक मिटिंगचे इतिवृत्त लिहिलेले नाही त्यामुळे नियमांचा भंग केल्याप्रकरणी ग्रामसेवकांची चौकशी करावी. शिवाय ग्रामपंचायत मध्ये काही वस्तूंची खरेदी करण्यात आली आहे त्याची जी बिल जोडण्यात आली आहेत ती जीएसटी बिल नाहीत. जोडलेल्या बिलामध्ये तफावत दिसत आहे.
🟫 काही ठिकाणी पाखाड्या बांधण्यात आल्या आहेत त्या जागेच्या इस्टीमेंटप्रमाणे कामच झालेले नाही. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील बौद्धवाडी, चिंचवाडी, गराटेवाडी अशा ठिकाणी नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याची बिलेच गायब असून नेमके काय दुरुस्त केले याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
🟫 तसेच शासनाकडून सौरदिवे खरेदी करण्यात आले होते ते दिवे गायब असून दिव्यांवर रिपेअरिंगचा हजारो खर्च करण्यात आला आहे. त्याचे कोटेशन नाही. सरळ ठेकेदाराला नेमून रक्कम अदा करण्यात आली आहे.
🟫अशा अनेक कामात भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले असून त्याबाबतचे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेले पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले.