विजेचा वापर आज प्रत्येक घरात होत आहे, आणि या वीज आपल्या जीवनातील एक मूलभूत गरज बनलेली आहे, आज प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होताना आपल्याला दिसून येते, एक दिवस जर वीज नसेल तर माणसाला करमत नाही, आणि वीज माणसाला एक वरदान म्हणून लाभले आहे, आपण जर विजेचा योग्य वापर केला तर आपल्याला विजेचे अनेक फायदे पाहायला मिळतील.
पण तेच जर आपण विजेचा वापर निष्काळजी पणे केला तर आपल्याला विजेपासून धोका सुध्दा आहे, आपण बरेचदा वृत्तपत्रांमध्ये किंवा बातम्यांमध्ये पाहिले असेल की विजेचा झटका लागल्याने एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाली पण विजेचा झटका लागल्याने व्यक्तीचा मृत्यू कसा होते, तर आजच्या लेखात आपण तेच पाहणार आहोत की व्यक्तीला विजेचा करंट लागल्याने आपल्या जीवास का मुकावे लागते, तर चला पाहूया..
बरेचदा आपल्याला विजेचा झटका लागतो पण तेव्हा आपल्याला फक्त जाणीव होते की विज किती पावर फुल आहे, आणि काही ठिकाणी तर विजेमुळे होणाऱ्या घटना ही समोर येताना दिसतात, पण असे का होत असेल की विजेचा जोराचा झटका एखाद्याचा जीव सुध्दा घेऊ शकतो.
आपल्याला माहीतच असेल की मानवाच्या शरीरात ६५% – ७०% प्रतिशत पाणी असते. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला विजेचा जोराचा झटका लागतो तेव्हा तो विजेचा झटका मानवाच्या शरीरातील पाण्याला पूर्णपणे सुकून टाकतो आणि त्यामुळे मानवाच्या शरीरातील रक्त हे घट्ट बनतं आणि घट्ट झालेलं रक्त माणसाच्या शरीरात व्यवस्थितरित्या प्रवाहीत राहत नाही. शरीराच्या महत्वाच्या भागाला रक्त न पोहचल्यामुळे शरीर काम करणे बंद करते आणि काही वेळातच माणसाचा मृत्यू होते.
विजेचा वापर करताना कोणत्याही प्रकारची निष्काळजी आपल्याला प्राणास मुकवू शकते, त्यासाठी कधीही विजेचा वापर करताना काळजी घेऊन करावा. जसे ओल्या हातांनी विजेच्या बटनांना स्पर्श करू नये, विजेचा वापर करताना संपूर्ण काळजी बाळगणे गरजेचे आहे.