(बंगळुरू)
इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेला ३१५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. नंदन नीलेकणी यांनी भारतीय आयआयटी मुंबईतून १९७३ मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. माजी विद्यार्थी या नात्याने नीलेकणी यांनी आयआयटी मुंबईला देणगी दिली. आयआयटी मुंबईमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती, नवीन क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळवली असे नीलेकणी यांचे विचार आहेत.
नंदन निलेकणी यांनी यापूर्वीही संस्थेला ८५ कोटी रुपये दान केले आहेत. ते आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. या रकमेच्या मदतीने संस्थेला जागतिक पातळीवर पायाभूत सुविधा तयार करण्यास मदत मिळेल. त्याशिवाय इंजिनिअरिंग आणि टेक्नाॅलाॅजीच्या उदयोन्मुख रिसर्च आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन मिळेल. आयआयटी, मुंबईसाठी निलेकणींनी दान केलेली ही सर्वाधिक देणगी आहे. यामुळे आयआयटी मुंबईला इंजिनिअरिंग आणि टेक्नाॅलाॅजीमध्ये संस्थेला मदत होणार आहे.
नीलेकणी यांनी या बाबत ट्विटद्वारे माहिती दिली. या देणगीच्या अनुषंगाने आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाष यादव आणि नीलेकणी यांनी बंगळुरू येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारतातील कोणत्याही आयआयटीला माजी विद्यार्थ्याकडून मिळालेली ही सर्वांत मोठी देणगी ठरली आहे.
निलेकणी म्हणाले, आयआयटी मुंबईचं माझ्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या आय़ुष्याच्या सुरुवातीच्या काळात माझ्या जीवनाला आकार या संस्थेने दिला आहे. या संस्थेशी माझे असलेले नाते आज ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी हे दान करत आहे. कोणत्याही वित्तीय दानापेक्षा ह्याचे मूल्य माझ्यासाठी अमूल्य आहे. या संस्थेने मला खूप काही दिलय. भविष्यातही चांगले विद्यार्थी घडवण्यासाठीही या संस्थेचे योगदान मोठे आहे. आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. सुभाषिश चौधरी यांनीही या दानामुळे विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले.