( ठाणे / उदय दणदणे )
मुबंई रंगमंचावर गेली२४ वर्षे अविरतपणे नमन लोककलेतून ऐतिहासिक नाट्यकलाकृती सादरीकरण करणारे गुहागर तालुका सुपुत्र तसेच इतिहास प्रेमी लोककलावंत लेखक दिग्दर्शक- संदिप कानसे निर्मित १६४ वा नमन कार्यक्रम आणि बहुचर्चित ऐतिहासिक नाट्यकलाकृती, इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा “उंबरखिंड” वगनाट्याचे उद्या मुबंई रंगमंचावर शुभारंभ प्रयोग होत आहे.
साई श्रद्धा कलापथक- कानसे ग्रुप (मुबंई )आयोजित नमन (पारंपरिक-गण-गौळण) व संदिप कानसे लिखित / दिग्दर्शित- “उंबरखिंड” वगनाट्याचं शुभारंभ प्रयोग उद्या बुधवार दिनांक-२१ डिसेंबर-२०२२ रोजी रात्रौ-०८-३० वा. दामोदर नाट्यगृह, परेल-मुबंई ,येथे होत असून सदर होणाऱ्या २०२२ या मोसमातील शुभारंभ प्रयोगाला नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र-भारत) संलग्न: गुहागर तालुका शाखेच्या वतीने समस्त नमन मंडळ,आयोजक, निर्माते, कलाकार, खेळे मंडळी यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
सदर नमन कार्यक्रमाला नाट्यगृहात उपस्थित राहणाऱ्या रसिकांनी अयोजक, निर्माते, आणि नाट्यगृह व्यवस्थापन यांना सहकार्य करत त्याचबरोबर नमन प्रयोग चालू असताना कलाकारांचे लक्ष विचलित होईल असे कोणतेही कृत्य करू नये. आपल्या कोकणातील सुसंस्कृतपणाची व कोकणात जपलेल्या विविध लोककलांची ओळख अवघ्या जगाला व्हावी यासाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे. तमाम नमन कलाप्रेमी रसिकांना आवाहन करण्यात येते की, कोकणातील बहुप्रिय लोककला नमन कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून नमन लोककलावंताना नमन लोककला जपण्यासाठी उपकृत करावे असे आवाहन, नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र भारत) मध्यवर्ती मुबंई वतीने अध्यक्ष- रविंद्र मटकर, तसेच गुहागर तालुका शाखेचे अध्यक्ष-सुधाकर मास्कर यांनी केले आहे.