(जीवन साधना)
मंत्राचे नियमित जप केले पाहिजेत, ज्यामुळे मनाची शक्तीच वाढत नाही, तर सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. मंत्रांच्या जपच्या वेळी पावित्र्यता ठेवावी. जसे घरात असल्यास देवघरात बसून, कार्यालयात असल्यास पायातून पादत्राणे काढून या मंत्रांचा आणि देवाचे स्मरण करावे. यामुळे आपणास मानसिक बळ मिळते, जे आपल्या उर्जेला वाढविण्यास सिद्ध होतील. आपण आपल्या ज्या इष्ट किंवा आराध्य देवी किंवा देवांची उपासना करत असाल तर त्यांचे नाममंत्राचे जप करू शकता. काही देवतांचे मंत्रजप पुढीलप्रमाणे…
बटुक भैरव स्तोत्र :
या स्तोत्राचा पाठ केला असता महामारी राजभय अग्नीभय चोरभय भयानक स्वप्न निवारण होताना दिसतात. घोर बंधन निर्माण केले असता त्यातून बाहेर पडण्यासाठी बटुक भैरव स्तोत्र वाचणे लाभदायक ठरते. यामुळे सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते कमीत कमी 108 वेळा या स्तोत्राचे पठण करावे
श्री सूक्त पठण :
श्री सूक्त पठण केले असता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आपल्या घरी आर्थिक स्थिरता मिळताना दिसते लक्ष्मी आपल्या घरी पाणी भरताना दिसते याच्या अकराशे आवृत्ती म्हणजेच अकराशे पाठ केले असता त्याचा विशेष लाभ होतो
श्री कनकधारा स्तोत्र :
हे स्तोत्र आद्य शंकराचार्य यांनी रचलेले आहे. हे पाठवताना प्रत्यक्ष देवीने सुवर्ण वर्षा केली होती. कनकधारा स्तोत्राचे पाठ केले असता घरामध्ये ऑफिसमध्ये व्यापारामध्ये उत्तरोत्तर प्रगती होताना दिसते आर्थिक स्थिती सुधारते
श्रीमद् भगवद्गीता :
महाभारतात भीष्म पर्व मध्ये याचे लिखाण केलेले आहे व्यासमुनींनी भगवद्गीता रचली आहे यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला आत्मज्ञान दिलेली आहे आणि कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे याचे पाठ केले असता घरामध्ये शांती सुख-समृद्धी मिळताना दिसते सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात
श्री अखंड रामचरितमानस पाठ :
रामचरितमानस पाठ तुलसीदास यांनी रचलेले आहे. यामध्ये सात कांड ज्याचे पारायण करणे आवश्यक आहे याचा अखंड पाठ करावा लागतो. जो 20 ते 25 तासांमध्ये पूर्ण होताना दिसतो. रामचरितमानस पाठ केला असता घरामध्ये शांती यश कीर्ती मिळते, मनुष्य नीतीने चालतो.
सुंदर कांडपाठ :
सुंदर कांड हे देखील महाकवी तुलसीदास यांनी रचलेले आहे. या पाठांमध्ये रामचरितमानस प्रमाणेच श्री हनुमान यांना प्रसन्न करण्याचे सामर्थ्य आहे. शनीचा प्रकोप नष्ट होण्यासाठी याचा पाठ केला असता सर्व प्रकारचे लाभ मिळतात. कमीत कमी 108 ब्राह्मण द्वारे याचा पाठ केला जातो.
बजरंग बाण :
बजरंग बाण याचे पाठ मनुष्यासाठी सुरक्षित आहे हे पाठ केले असता मनुष्य सर्व बाधापासून सुरक्षित राहतो. जादूटोणा तोडगा तोटका यापासून संरक्षण होताना दिसते. कमीत कमी याचे 52 पाठ केले असता विशेष लाभ प्राप्त होताना दिसतात.
हनुमान चालीसा :
हनुमान चालीसा कलियुगातील मनुष्यासाठी जीवनाचा आधार समजला जातो. याचे पाठ सकाळी केले जातात परंतु विशेष रूपाने 41 दिवस 100 पाठ केले असता कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य पूर्ण होताना दिसते याचे पाठ अनुष्ठान पूर्वक करावेत.
हरी किर्तन (हरे राम हरे कृष्ण) :
प्रभू श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होण्यासाठी घरात आनंद सुख समृद्धी राहण्यासाठी सन्मार्ग प्राप्तीसाठी हरिकीर्तन पाठ केले जातात. ते कधीही केले जातात याला बंधने नाहीत
श्री सुंदर कांड वाल्मीकि रामायण :
वाल्मीकि रामायण मध्ये असणारे सुंदर कांड पाठ संतान बाधा दूर करताना दिसतात. कोणत्याही प्रकारची बाधा आणि संघर्ष हे पाठ केले असता संपतात. हा एक याद्निक प्रयोग आहे सलग 108 पाठ हवनात्मक केले असता त्याची चांगली फळे मिळताना दिसतात.
श्रीललिता सहस्रनाम पाठ :
श्री ललिता सहस्त्रनाम दुर्गा मातेची पूजा आहे यामध्ये सहस्र नावे घेऊन अर्चन पूजन अभिषेक हवन केले असता विशेष प्रकारचे रोग दूर होताना दिसतात.
श्री शिव सहस्त्रनामावली :
शिव सहस्त्रनामावली पाठ केले असता अनेक रोगांपासून मुक्ती मिळते शिवाजी सहस्रनामावली अर्चना अभिषेक हवन केली असता अपारशांती मिळते.
श्री हनुमान सहस्रनामावली :
श्री हनुमंत सहस्त्रनामावली याचे विशेष पाठ केले असता शनि दोष नाहीसा होताना दिसतो.
श्री शनि सहस्रनामावली :
शनीचा प्रकोप शांत होण्यासाठी किंवा साडेसाती पासून त्रास कमी होण्यासाठी शनि सहस्त्रनामावली पाठ करावेत.
श्री कात्यायनीदेवी जप :
ज्या मुलीच्या विवाहमध्ये बाधा येत आहे किंवा विवाह विलंब होत आहे त्यांनी कात्यायनी देवीचा 41 हजार मंत्र जप करावा भाजप केळीचे पान खाऊन ब्राह्मण करतात. असे केले असता मुलीच्या विवाह येणारे अडथळे दूर होतात याचे 21 दिवस अनुष्ठान करून पाठ केले असता शुभ फळे मिळताना दिसतात
श्री गोपाल सहस्त्रनाम :
एखाद्या दाम्पत्याला संतानप्राप्ती होत नाही किंवा पुत्र प्राप्तीची इच्छा असते. त्यावेळी संतान गोपाल सहस्रनाम मंत्र म्हणतात असे केले असता सदाचारी धार्मिक असे मुल प्राप्त होण्याची शक्यता असते. याचा सव्वा लाख जप करावा अद्भुत लाभ होताना दिसतात
श्री हरिवंश पुराण :
श्री हरिवंश पुराण कथा याचे श्रवण करणे अत्यंत प्रभावी असते. ज्या घरांमध्ये संतती निर्माण होताना त्रास होताना दिसतो, त्यासाठी हरिवंशपुराण याचे पारायण करावे याचा कार्यक्रम सात दिवस करावा अनुष्ठान करावे
श्री शिव पुराण :
शिवपुराणमध्ये भगवान शिव यांच्या लीला आणि अवतारांचे वर्णन केलेले आहे. श्रावण मास हा पुरुषोत्तम मास समजला जातो
शिवाच्या सर्व अवतारांचे वर्णन यामध्ये केलेले आहे श्रावण महिन्यात याचे पाठ केले असता जास्त महत्त्वाचे समजले जाते.
श्रीदेवी भागवत :
श्रीदेवी भागवत यामध्ये अठरा हजार श्लोक आहेत. यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी याचे पाठ केले जातात याचे विशेष महत्त्व नवरात्र पर्वमध्ये आहे.
श्री गणेश पूजन आणि अभिषेक :
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणेश पूजन आणि अभिषेक केला जातो. यामुळे सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात आपल्या कार्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होते.
भूमिपूजन :
भूमिपूजन ऑफिस किंवा घराचे उद्घाटन केले असता कार्याची सुरुवात करण्यासाठी केले जाते यामुळे सर्व प्रकारच्या बाधा निवारण होताना दिसतात आणि सर्व कार्य सोप्या पद्धतीने संपन्न होताना दिसते.
रुक्मिणी स्वयंवर पाठ :
ज्या मुला-मुलींचे विवाह लवकर जमत नाहीत. मनासारख्या जोडीदारासाठी रुक्मिणी स्वयंवरचे पाठ केले जातात असे केले असता मनाजोगा जोडीदार मिळतो
संकलन व साभार
सौ सुवर्णा सुत्रावे
कुंडली मित्र
ज्योतिष पंडित