(मुंबई)
सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेष करून अल्पवयीन मुली आणि तरुणींशी ओळख वाढवून आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांच्या हद्दीत अशीच एक घटना घडली. इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडिताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशीनाथ पाटील (वय, २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी डोंबिवली पूर्वेतील रहिवाशी आहे. आरोपी आणि पीडिता यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या ओढून २४ जुलै २०२३ रोजी डोंबिवली पश्चिम येथे भेटायला बोलवले. यानंतर पीडितावर अत्याचार केले.
दुपारी घरातून गेलेली मुलगी घरी न पतल्याने तिच्या कुटुंबीयांनी २५ जुलै रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची टिळकनगर पोलिसांत तक्रार दिली. यानंतर टिळकनगर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला आणि काशीनाथला अटक केली. याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली. याप्रकरणी टिळकनगर पोलीस अधिक तपास करीत आहे. तर या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागणी स्थानिक करत आहेत.